ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जी-२० परिषदेचे सांताक्रूझला आयोजन.

जी-२० परिषदेचे सांताक्रूझला आयोजन.

प्रकाशन: 16 Dec 2022 03:20 PM
वाचन संख्या 110

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : जी-२० परिषदेच्या प्रतधींना राज्यातील अभिजात कला व संस्कृतीची माहिती देणारे स्टॉल परिषदस्थळी आयोजीत..

विभागामार्फत उभारण्यात आले आहेत. या स्टॉलना या सर्व प्रतिनिधींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.

सांताक्रुझ येथील हॉटेल ग्रँड हयात येथे जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टॉल्सना मिळणारा प्रतिसाद याविषयी माहिती देताना श्री. कुशवाह बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सहसंचालक सुरेश लोंढे, उपसंचालक संगीता हिवाळे उपस्थित होते.

श्री. कुशवाह म्हणाले, या स्टॉलमध्ये बिरडी कला, लातूर येथील बंजारा समाजातील विविध दागिने आणि कपडे, कोल्हापूर येथील चांदीचे दागिने आणि कोल्हापुरी चपला, औरंगाबाद येथील हिमरू शाल आणि पैठणी साड्या, सांगली येथील वाद वृंदांचा स्टॉल यांचा समावेश आहे. गेले दोन दिवसापासून जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती देण्यात येत आहे. या प्रतिनिधींकडून देखील अतिशय उत्सुकतेने विविध प्रश्न या कारागीरांना विचारले जात आहेत. तसेच विशेष कौतुकही केले जात आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स