ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद.

कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 15 Dec 2022 07:11 AM
वाचन संख्या 68

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या माळगांव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचवी ते सातवी गटात योगेश विजयानंद जोशी (राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी) याने तर आठवी ते दहावी गटात श्रावणी राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कुल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
पाचवी ते सातवी गटात अस्मि प्रवीण मांजरेकर (राणी पार्वतदेवी हायस्कुल, सावंतवाडी), विभव विरेश राऊळ ( मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. दीप्ती आपा सावंत (कुडाळ हायस्कुल) व शमिका राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कुल) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आठवी ते गटात आर्या सुयोग सातोसकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), प्राची गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. समृद्धी कृष्णा गवस (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव) व रामदास पुंडलिक मोर्ये (श्रीरंग लाडकोबा देसाई विद्यालय, पाट) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे उदघाटन बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक मंडळ उपस्थित होते. पारितोषिकांचे वितरण परीक्षक चंद्रकांत सावंत, भारत गावडे, सुमेधा सावंत, पत्रकार निलेश मोरजकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले तर आभार संचालक पृथ्वीराज बांदेकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स