ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा शहरात बंद फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी..!

बांदा शहरात बंद फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी..!

प्रकाशन: 12 Dec 2022 05:25 PM
वाचन संख्या 96

संबंधितासह अन्य चार साथीदारही पोलिसांच्या ताब्यात….

बांदा | राकेश परब :
बांदा शहरात भर दिवसा चोरीच्या उद्देशाने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या परप्रांतीय चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भर दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी याच इमारतीत राहणाऱ्या त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,बांदा शहरात नवीन महामार्गनजीक असलेल्या इमारतीत हे परप्रांतीय कामगार एका सदनिकेत राहतात.त्याच्या शेजारी अन्य एक सदनिका आहे.या सदनिकेचा मालक आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फ्लॅट बंद करून चावी नजिकच ठेऊन बाजारात निघून गेला.ही संधी साधतं लगतच्या सदनिकेत असलेल्या परप्रांतीय कामगारांने चावी चोरून फ्लॅट उघडला.त्याने आतमध्ये प्रवेश केला.मालक आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा आढाळाला. त्यांनी खात्री केली असता चोरटा आतमध्ये असल्याचे निदर्शनास आले.त्याने बाहेरून कडी लावत दरवाज्याला टाळे लावले. याची माहिती मिळताच सरपंच अक्रम खान, माजी सभापती प्रमोद कामत, सागर सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, विठोबा सावंत,विजय जाधव,तुषार वाघाटे यांनी घटनास्थळी येत सर्वांसमक्ष दरवाजा उघडला. त्यावेळी टॉयलेटची खिडकी तोडत त्याने पलायन केले.तसेच तात्काळ त्याने नजिकच असलेल्या आपल्या सदनिकेत पाठीमागील खिडकीतून आत जातं आश्रय घेतला.

पोलिसांनी दरवाजा तोडत त्याला ताब्यात घेतले.तसेच त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स