अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची होतेय निर्मिती.
आज मालवणात जवळपास एक दिवसानंतर स्वच्छ सूर्य दर्शन…!
मालवण | सुयोग पंडित : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले असून जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम प्रमाणात पाऊस पडला आहे. मालवण शहरात काल ११ डिसेंबर पासून वातावरण ढगाळ असून व परिसरात अतिशय हलक्या प्रमाणात पाऊस ‘शिंपडत’ आहे. मात्र मालवण शहरात आज सकाळी ०८:४५ पासून स्वच्छ सूर्यदर्शन होत आहे .
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात १५ डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमताच आता पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वार्याचा वेग वाढला आहे.
राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात १५ डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात १४ ठिकाणी या पावसाचा प्रभाव असेल तर विदर्भात आजचा दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण सुद्धा ढगाळ झाले असून जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम प्रमाणात पाऊस पडला आहे. मालवण शहरात काल ११ डिसेंबर पासून वातावरण ढगाळ असून व परिसरात अतिशय हलक्या प्रमाणात पाऊस ‘शिंपडत’ आहे. मात्र मालवण शहरात आज सकाळी ०८:४५ पासून स्वच्छ सूर्यदर्शन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)