ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
बारसू -सोलगाव पंचक्रोशीतील रिफायनरी विरोधी संघटनेचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणीचे निवेदन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बारसू -सोलगाव पंचक्रोशीतील रिफायनरी विरोधी संघटनेचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणीचे निवेदन.

प्रकाशन: 10 Dec 2022 05:33 PM
वाचन संख्या 83

संतोष साळसकर | ब्युरो चीफ : बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेत बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित होऊ शकणार्या प्रदूषणकारी रिफायनरी विरोधात येत्या विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी केली. तसेच रिफायनरी विरोधी मेळाव्याला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठींबा दर्शविणार असल्याचे सांगितले. तसे निवेदन रिफायनरी विरोधी संघटनेने दिले आहे. यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांनी संघटनेची भूमिका जाणून घेत मागणी मान्य केली.

रिफायनरी विरोधी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,नाणार परिसरातील रद्द झालेली प्रदूषणकारी रिफायनरी आता बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पामुळे कोकणाचे रासायनिक गटार होणार आहे. या प्रकल्पाचे गंभीर दुष्परिणाम हापूस आंबा, मासेमारी व पर्यटन या शाश्वत उपजीविकेच्या साधनांवर होऊन स्थानिक कोकणी माणूस देशोधडीला लागणार आहे. नुकत्याच झालेल्या देवगड किनाऱ्यावरील तेल गळतीचे मासेमारी व पर्यटन यावर काय परिणाम झाले हे सर्वानी बघितले आहेत. राजापूर , देवगड असा हा केमिकल झोन पूर्ण दक्षिण कोकणाला काबीज करू शकतो. तसे नियोजनही सध्याचे सरकार करत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कोकणात पायच ठेवू द्यायचा नाही हीच गोष्ट आपणा सरख्या कोकणप्रेमी लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित आहे
येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात आपण कोकणात रिफायनरी सारखे प्रकल्प नको, परप्रांतीयांनी केलेले व्यवहार, ग्रामस्थ आंदोलकांवर होणारी दडपशाही, तडीपारीच्या नोटिसा, बेकायदेशीर सर्वे आदी मुद्दे उचलून धरावेत तसेच या भागातील वारसास्थळ असलेली कातळशिल्प संरक्षण हा महत्वाचा मुद्दा देखील आपण विधानसभेत उचलावा. शिवसेना पक्ष हा नेहमीच जनतेसोबत असतो म्हणून पक्षाची रिफायनरी विरोधी भूमिका स्पष्ट करण्यात आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी रिफायनरी विरोधी संघटनेने आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सचिव सतीश बाणे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव,दीपक जोशी,भगवान सोगम, सदानंद सोगम, रमेश सोडये, रामचंद्र शेळके, शशिकांत मांडवकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स