ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
निशांत करंदीकरची भारतीय संघात निवड

निशांत करंदीकरची भारतीय संघात निवड

प्रकाशन: 24 Sep 2021 07:16 PM
वाचन संख्या 57

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा निशांत आहे जिम्नॅस्ट

शुभम गीरी यांचीही साउथ आशियाई स्पर्धेत ज्युनिअर गटासाठी भारताच्या प्रशिक्षकपदी निवड

मसुरे | प्रतिनिधी : जपान येथे होणाऱ्या ५० व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरीता दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे सिनिअर गटासाठी व ढाका येथे होणाऱ्या सेंट्रल साउथ आशिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरीता ज्युनिअर व सिनिअर गटासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर पासुन ढाका येथे सुरु होणाऱ्या‘सेंट्रल साउथ आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत  मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील निशांत करंदीकर  याची पहिल्या क्रमांकावर निवड झाली असून ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे.निशांत हा मुलांच्या गटातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील पहिला खेळाडु आहे जो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. निशांतच्या निवडीमुळे संकुलाचेअध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व कार्यवाह मोहन राणे तसेच मुख्याधिकारी प्रीतम क़ेसकर यांनी अभिनंदन केले आहे. निशांतने गेली ८ ते १० वर्षे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात प्रशिक्षक विशाल कटकदौड़ व नीलम बाबरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो पुढील स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठी नुकत्याच प्रबोधनकारठाकरे क्रीडा संकुलात रूजु झालेले जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक शुभम गीरी यांच्या मार्गदर्शनाख़ाली जिम्नॅस्टिक्स या खेळाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेत आहे.प्रशिक्षक शुभमगीरी यांचीही साउथ आशियाई स्पर्धत ज्युनिअर गटासाठी भारताच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. वडिल डॉ. रमेश य.प्रभू व आई डॉ. पुष्पाताई र.प्रभू यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या मिशन ऑलिम्पिकचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा अध्यक्ष अरविंद दादा प्रभू यांना वाटते.खेळाडूंना पुढे जाण्यासाठी योग्य ती मदत करण्यास समिति नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे व त्यामुळेच महाराष्ट्र राज्यजिम्नॅस्टिक्स संघटनेचे प्रमुख कार्यवाह मकरंद जोशी यांनीही राज्य संघटनेमार्फ़त क्रीडा संकुलाचे आभार मानले आहेत. यापूर्वी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या मुलींच्या गटातून वंदिता रावल, द्विजा आशर, श्रावणी वैद्य, उर्वि अभ्यंकर, अनुष्का पवार अशा अनेक खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स