मडुरा माऊलीचा ९ डिसेंबरला जत्रोत्सव..!
बांदा | राकेश परब :
मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार ९ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सकाळी देवीची पूजाअर्चा झाल्यानंतर ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होतील. रात्री सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा व मध्यरात्री आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती व मडुरा ग्रामस्थांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)