बांदा लकरकोट येथे आज श्री दत्तजयंती उत्सव.
रात्री १० वाजता श्री दत्तप्रसाद हौशी नाट्यमंडळ ,लकरकोट प्रस्तुत ‘झिलग्याची खोली’ हा नाट्यप्रयोग होणार सादर.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा लकरकोट येथील श्री दत्त मंदिरात बुधवार आज ७ डिसेंबरला श्री दत्तजयंती सोहऴ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
पहाटे ५ वाजता श्रींची काकडआरती होणार आहे.७ वाजता सामुहीक अभिषेक,१०.३०ते १ श्री सत्यनारायण महापुजा,सायंकाळी ५ वाजता श्रीदत्त जन्म सोहळा,५.३० ते ६.३० कीर्तन,६.३० ते ९.०० भजन – मांगिरीश भजन मंडळ ,कुठ्ठाळी गोवा . तसेच रात्रो १० वाजता श्री दत्तप्रसाद हौशी नाट्यमंडळ ,लकरकोट प्रस्तुत ‘झिलग्याची खोली हा नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच गुरुवारी ८ डिसेंबरला दुपारी १२.३० ते ४.०० महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री दत्तप्रसाद कला क्रिडा मंडळ ,लकरकोट यांच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)