कणकवली तालुक्यातील लोरे नं १ येथील ज्येष्ठ नागरीक सुमित्रा रावराणे यांचे निधन.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ शिवगंगावाडी येथिल जेष्ठ नागरिक सुमित्रा हनुमंत रावराणे (९२) यांचे वृद्धापकाळाने २९ नोव्हेबर रोजी निधन झाले. ग्रामीण भागात आरोग्य सेवेची वानवा असताना त्याकाळी त्यांनी सामाजिक बांधिलकीतून लोरे दशक्रोशीत ‘दाई’ म्हणून काम करून अनेक मातांच्या सुरक्षित प्रसुत्या केल्या. जन सुरक्षा रक्षक म्हणून काम करून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, तीन विवाहीत मुली, जावई, नातवंडे, पतवंडे नातजावई असा परिवार आहे. सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप रावराणे यांच्या त्या आई तर मिठबाव प्राथमिक आरोग्य केंदाच्या मुख्य आरोग्य सहाय्यिका दिपाली रावराणे तसेच पत्रकार दिनेश साटम यांच्या त्या सासू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)