आज कणकवली-आचरा मार्गावरील सहा तासात एकही एस.टी. बस धावली नाही…!
बाजाराला आलेले सामान्य नागरीक आणि विद्यार्थ्यांचे हाल ; प्रचंड नाराजी.
श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आगारातुन, आज मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून कणकवली आचरा मार्गावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सहा तासात एकही एस.टी. बस मार्गावर न धावल्यामुळे विद्यार्थ्यांचे व बाजाराला आलेल्या ग्राहकांचे अतोनात हाल झाले.
बाजाराला आलेल्या ग्राहकांचे व विद्यार्थ्यांचे असे म्हणणे होते की बाकीच्या सर्व मार्गावर गाड्या धावत होत्या. परंतु कणकवली आचरा मार्गावर एकही गाडी धावत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि बाजाराला आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. शिवाय काल मंगळवार बाजाराचा दिवस असल्यामुळे बाजाराला आलेले ग्राहक व सकाळी साडेपाच वाजता घर सोडलेले कॉलेज व हायस्कुलचे विद्यार्थी तसेच अन्य कामगार या सर्वांना दुपारी १:३० वा. कणकवली आचरा मार्गे मालवण एस. टी. बस सुटल्या नंतर एकही बस या मार्गावर न सुटल्यामुळे मोठी गैरसोय झाली. यात बांदिवडे कणकवली तसेच कणकवली आचरा मार्गे देवगड, कणकवली ते तळाशील, बुधवळे, अशा चार ते पाच एस. टी. बस अचानकपणे रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
असे प्रकार अनेक वेळा होतात. अशा या एस. टी. च्या अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव नसल्यामुळे हे बेफिकीरपणे व्यवस्थापन करत असल्याचे एस. टी. अधिकाऱ्यांनीच दाखवून दिले आहे असे सांगत सर्व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)