साळशी केंद्रबल गटाच्या बाल, कला, क्रीडा व "ज्ञानी मी होणार" महोत्सवाचे साळशी हायस्कूलच्या भव्य पटांगणावर उद्घघाटन..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील केंद्रबल गटाच्या बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार या महोत्सवाचे उद्घघाटन हायस्कूलच्या भव्य पटांगणावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढऊन करण्यात आले.
यावेळी , चाफेड, भोगलेवाडी, कुवळे, रेंबवली, सांडवे, सरमळेवाडी, तर्फेवाडी, कुवळे- विरवाडी, धनगरवाडी या शाळांच्या क्रीडा स्पर्धा २९ नोव्हेंबर व ३० नोव्हेंबर या दोन दिवसात पार पडणार आहेत.
यावेळी केंद्रप्रमुख सौ. वर्षा लाड, माजी पंचायत समिती सदस्य सुनील गावकर, सरपंच वैभव साळसकर, हायस्कूल चेअरमन सत्यवान सावंत, हायस्कूल मुख्याध्यापक माणिक वंजारे, कुवळे सरपंच सौ. संगीता कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, कुवळे शाळा अध्यक्ष अमोल परब, सरमळेवाडी शाळा अध्यक्ष सौ. ज्योती मिराशी, कुवळे शाळा माजी अध्यक्ष अजय कदम, संतोष साळसकर, कैलास गावकर, केंद्रप्रमुख गंगाधर कदम, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, दानशूर व्यक्तिमत्त्व किशोर लाड, तुळशीदास परब, प्रकाश रावले, कुवळे शाळा मुख्याध्यापक विष्णू परब, रेंबवली शाळा मुख्याध्यापक सुगंध तांबे, चाफेड शाळा मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर, चाफेड भोगलेवाडी शाळा मुख्याध्यापिका सौ. रश्मी आंगणे, सरमळेवाडी मुख्याध्यापक संतोष गुरव, कुवळे तर्फेवाडी शाळा मुख्याध्यापिका संगीता माणगावकर, सांडवे शाळा मुख्याध्यापक जयवंत गावडे, कुवळे विरवाडी शाळा मुख्याध्यापक संतोष वळंजू, धनगरवाडी शाळा मुख्याध्यापक सुनील कोदले, शिक्षिका विनिता दुखंडे, मयुरी राणे, हेमलता जाधव, पुरुषोत्तम साटम, संजय मराठे, श्री भरणकर, सायली मोंडकर, शांताराम रावले आदींसह ग्रामस्थ, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच वैभव साळसकर, केंद्रप्रमुख सौ. वर्षा लाड, हायस्कूल चेअरमन सत्यवान सावंत यांनी आपली मनोगते थोडक्यात मांडली. या कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. रश्मी आंगणे यांनी केले. यावेळी मैदानावर क्रीडाज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करून क्रीडा मैदानाचे उद्घाघाटन माजी प.स.सदस्य सुनील गावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)