६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उद्या मालवणचे 'बझर'…!
कसलेले कलावंत सचिन टिकम,सुशांत पवार, वैभव वळंजू यांच्यासह चतुरस्त्र जाणीव अभिनेत्री शुभदा टिकम यांचा अभिनय आहे प्रमुख आकर्षण.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उद्या सोमवारी संध्याकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा – मालवण तर्फे मालवणातील कसलेले कलावंत दोन अंकी नाटक ‘बझर’ सादर करणार आहेत.
अभय कदम दिग्दर्शित या नाटकात कसलेले कलावंत सचिन टिकम,सुशांत पवार, वैभव वळंजू यांच्यासह चतुरस्त्र जाणीव अभिनेत्री शुभदा टिकम यांचा अभिनय पहाणे हे नाट्य रसिकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या नाटकाचे तिकीट दर अनुक्रमे रुपये १५/- आणि १०/- असे असून तिकिट विक्री ६ वाजल्यापासून नाट्यगृहात सुरु असणार आहे.
६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची चुरस सध्या वाढत जात असून मालवणच्या ‘बझर’ नाटकाबद्दल नाट्य रसिकांची उत्कंठा वाढत चालली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)