ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे येथे २७ नोव्हेंबरला श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी..!

मसुरे येथे २७ नोव्हेंबरला श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी..!

प्रकाशन: 26 Nov 2022 02:57 PM
वाचन संख्या 39

मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे देऊळवाडा येथील श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी २७ नोव्हेंबर २०२२ रोजी साजरी होणार आहे . या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. स्वामींच्या पादुकांची विधीवत पूजा अर्चा, १० वा. महाआरती व स्थानिकांचे सुश्राव्य भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री भरतेश्वर मंदीर येथे सत्यनारायणाची महापूजा, तदनंतर आरती व तीर्थप्रसाद, रात्रौ ठीक १० वा. भरतेश्वर नाट्य मंडळाचा “तुला काय हवंय ” ? हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स