ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
दशावतारी कलाकार विनायक येरागी याला युवा कला गौरव पुरस्कार झाला जाहीर..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

दशावतारी कलाकार विनायक येरागी याला युवा कला गौरव पुरस्कार झाला जाहीर..

प्रकाशन: 18 Sep 2021 06:50 PM
वाचन संख्या 71

मालवण | वैभव माणगांवकर : मालवण दांडी येथील तरुण दशावतार कलाकार विनायक उर्फ गोट्या येरागी याला पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशनचा यावर्षीचा युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.विनायक उर्फ गोट्या येरागी या तरुण कलाकाराने स्त्री अभिनयाच्या जोरावर दशावतार कलाक्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे. जिल्ह्यातील अनेक दशावतारी मंडळामध्ये त्याने स्त्री पात्राच्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनयासोबतच विनायक हा नृत्य कलेतही पारंगत आहे. विविध क्षेत्रातील संस्थांनी त्याच्या कलेचा गौरव केला आहे. सध्या विनायक हा श्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापणमध्ये काम करीत आहे. येरागी याच्या अल्पावधीतील कलेची दखल घेऊन त्याची युवा कला गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्याचे कला क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स