साळशी हायस्कूलच्या पटांगणावर देवगड तालुका "शालेय कबड्डी स्पर्धा -२०२२"चे आयोजन..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : माध्यमिक विद्यामंदिर साळशी,साळशी ग्रामविकास मंडळ माध्यमिक विद्यामंदिर साळशी च्या पटांगणावर गुरुवार दिनांक २४/११/२०२२ ते शुक्रवार दिनांक २५/११/२०२२ या २ दिवशी देवगड तालुका शासकीय शालेय सर्व गटातील मुली व मुलगे यांच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
तरी या स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवार दिनांक २४/११/२०२२ रोजी सकाळी -१०.००वा. होणार आहे.तरी या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला व स्पर्धा पाहण्यासाठी आपण वेळीचं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्याध्यापक माणिक वंजारे , चेअरमन सत्यवान सावंत माध्य. वि.म़.साळशी. /स्कूल कमिटी.यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)