देवगड येथे २४ नोव्हेंबरला वीज ग्राहक मेळावा…..!
विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (सिंधुदुर्ग मंडल) शाखा देवगडा आयोजित तसेच सिंधुदुर्ग व देवगड तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ, देवगड यांच्या सहकार्याने प्रथमच गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय जामसंडे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वा. पर्यंत शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी देवगड येथे प्रथमच “विज ग्राहक मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात वीज बिला बाबत तक्रारी, बंद असलेले पथदिप, वाढिव विज बिले, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, महावितरणच्या विविध योजना या आणि अशा अनेक तक्रारींचा तात्काळ निकाल करण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी ग्राहकांनी आपल्या मनातील शंका-कुशंका, गैरसमज, तक्रारी मांडाव्यात व सर्वांनी मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री शैलेश कदम-अध्यक्ष देवगड तालुका व्यापारी संघ, श्री लक्ष्मण पाताडे अध्यक्ष-ग्राहक पंचायत देवगड, वाळके-सचिव सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटना व प्रसाद पारकर-अध्यक्ष सिंधुदुर्ग व्यापारी संघटना यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख व...
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...