ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी भाजपाचे प्रमोद रावराणे तर व्हाईस चेअरमनपदी अंबाजी हुंबे बिनविरोध….!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वैभववाडी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी भाजपाचे प्रमोद रावराणे तर व्हाईस चेअरमनपदी अंबाजी हुंबे बिनविरोध….!

प्रकाशन: 10 Nov 2022 11:14 PM
वाचन संख्या 70

वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजपचे प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हा.चेअरमन पदी अंबाजी यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व सहकारातील पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी तसेच सर्व संचालकांनी प्रमोद रावराणे, अंबाजी यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना प्रमोद रावराणे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तसेच वर्षभरात 1000 सभासद संख्या संचालकांना विश्वासात घेऊन वाढविणार आहे. भुईबावडा येथे संघाचे खरेदी विक्री केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. संघाच्या मालकीची इमारत असावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खत विक्री व भात खरेदी बरोबर तालुक्यात दुग्ध उत्पादन वाढ, बांबू लागवड, कुक्कुटपालन व इतर पूरक व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना आर्थिक सदन करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. भात विक्रीतून चारशे पाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 34 लाख रक्कम जमा झाली आहे. यंदाही संघामार्फत भात खरेदी केले जाईल असे सांगितले. कमी किमतीत शेतकऱ्यांकडून भात खरेदी करणाऱ्या बेकायदेशीर व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे यावेळी प्रमोद रावराणे यांनी सांगितले. या संघासाठी कायदेशीर सल्लागार नियुक्त करणार त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी वर्षभरात पाच प्रशिक्षण राबविणार असेही रावराणे यांनी सांगितले. चेअरमन पदावर संधी दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे तसेच वैभववाडी भाजपचे आभार मानले. यावेळी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जेष्ठ पदाधिकारी सज्जनकाका रावराणे तसेच सर्व संचालक भाजपा पदाधिकारी आदी उपस्थित होते. निवडीनंतर ठाकरे गट शिवसेना, शिंदे गट शिवसेना पदाधिकारी यांनी रावराणे, यांचे अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स