मुणगे येथे २५ कुटुंबांना अत्यावश्यक साहित्य वाटप !
प्रतिनिधी / मसुरे : यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री आनंद मालाडकर आणि श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठान मुनगे आणि मुंबई विद्यामाने गावातील २५ निराधार कुटुंबाना(एक हात मदतीचा माझ्या गावच्या ग्रामस्थांसाठी ) अन्नधान्य व संपूर्ण किराणा सामान वाटप करण्याच्या संकल्पाला गणेशोत्सवाचे औचित्य साधत प्रारंभ करण्यात आला. तसेच यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री आनंद मालाडकर आणि श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठान मुणगे आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण मुणगे गावातील ३१५ गणपती करिता पूजा साहित्य धूप,कापूर, अगरबत्ती, आणि साखर यांचे वाटप करण्यात आले. श्री देवी भगवती छाया प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या वतीने सदर वितरण करण्यात आले. तसेच सर्व गणेश भक्तानां मनःपुर्वक शुभेच्छा देत सर्वांना निरोगी आयुष्य,सुखसमृध्दी, भरभराटी लाभो ही गजनना चरणी सदिच्छा व्यक्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)