ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा

सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा

प्रकाशन: 12 Sep 2021 07:17 PM
वाचन संख्या 51

ग्रामीण रुग्णालय मालवणला युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांच्या वतीने एअर बेड व नेबुलायजर मशीन

वैभव माणगावकर / मालवण : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मालवण शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना आवश्यक गरज असलेले दोन एअर बेड व नेबुलायजर (वाफेच्या) मशीन रविवारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या.

विशेष बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला तात्काळ एअर बेडवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटपही अमेय देसाई यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, रोटरी क्लब अध्यक्ष उमेश सांगोडकर, राजा शंकरदास, उत्तम पेडणेकर, विद्याधर मेस्त्री, राजू कोवळे, मयू पारकर, वैभव मेस्त्री, तुषार मेस्त्री, विघ्नेश मांजरेकर, उमेश हर्डीकर दर्शन गावकर आदी उपस्थित होते.

जास्त दिवस बेडवर ठेवून उपचार सुरू असलेल्या रुग्णांना एअर (हवा) भरलेले बेड उपयुक्त असतात. तर रुग्णालयात आवश्यक अश्या नेबुलायझर मशीनची ग्रामीण रुग्णालयास असलेली गरज लक्षात घेता ही वैद्यकीय उपचार साधने वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्याचे अमेय देसाई यांनी सांगितले.

एकूणच रक्तदान चळवळ असो अथवा कोणतेही सामाजिक कार्य अमेय देसाई नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. कोरोना काळातही त्यांनी अखंड सेवाकार्य केले. त्याचीच दखल घेत विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा सन्मानही करण्यात आला. आज आपल्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयाची गरज ओळखून अमेय यांनी केलेल्या सेवा कार्याबाबत त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स