ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
यंगस्टार मित्रमंडळाचे शहराच्या सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान : नगराध्यक्ष समीर नलावडे.

यंगस्टार मित्रमंडळाचे शहराच्या सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान : नगराध्यक्ष समीर नलावडे.

प्रकाशन: 31 Oct 2022 09:49 AM
वाचन संख्या 30

कणकवली | प्रतिनिधी : संपूर्ण राज्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीच्या यंगस्टार कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळाचा नावलौकिक आहे. गेल्या ४० वर्षांत या मंडळाने विविध सामाजिक, क्रीडा विषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कणकवली शहराच्या वाटचालीत या मित्रमंडळाचे मोलाचे योगदान आहे. यापुढील काळात मंडळाने महिलांसाठीही विविध उपक्रम राबवावेत. या उपक्रमांना नगरपंचायत व समीर नलावडे मित्रमंडळातर्फे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यंगस्टार मित्रमंडळातर्फे आंबे आळी येथे होममिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे, उपाध्यक्ष प्रवीण आळवे, सचिव नंदू वाळके, मंडळाचे सल्लागार अनिल हळदिवे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, भरत उबाळे, प्रशांत साटविलकर, संतोष मालंडकर, रवी सावंत, नाना कोदे, राजू वाळके, संतोष पारकर, विवेक वाळके, मंदार कोदे, विद्या वळंजू, नीलम पारकर, प्रियाली कोदे, साक्षी वाळके, रमा वाळके, गार्गी कामत, सान्वी कामत, पूजा माणगावकर, अंकिता सापळे, अमिता राणे, सागर राणे, ऋषी वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.अण्णा कोदे म्हणाले, यंगस्टार मित्रमंडळाचे कार्यक्रम व उपक्रम सर्वसमावेश असून यापुढील काळात महिलांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम घेतले जाणार आहेत यांत महिलांना प्राधान्य दिले जाईल. तसेच मंडळाचा होममिनिस्टर स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. अनिल हळदिवें व रमेश जोगळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दीपावलीनिमित्त यंगस्टार मित्रमंडळाने आंबेआळी येथे होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. यात ऋचा वाळके या पैठणीच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक भाग्यश्री गावकर तर तृतीय क्रमांक साईशा लाड यांनी प्राप्त केला. या स्पर्धेत ६९ महिला सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे, भरत उबाळे, मंदार कोदे, रमेश जोगळे, सचिन कामत, नाना कोदे, राजू वाळके, प्रियाली कोदे, नंदू वाळके, प्राची कर्पे, साक्षी वाळके, अमिता राणे, गार्गी कामत, सान्वी कामत, रमा वाळके, पूजा माणगावकर, रवी सावंत, संतोष मालंडकर आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आली. स्पर्धेचे निवेदन नितीन घाणेकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स