ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा दशक्रोशीत मुसळधार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान..!

बांदा दशक्रोशीत मुसळधार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान..!

प्रकाशन: 19 Oct 2022 10:00 PM
वाचन संख्या 31

बांदा | राकेश परब :
बांदा दशक्रोशीत झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक काही ठिकाणी पूर्णत: जमीनदोस्त झाले तर उभ्या परिपक्व पिकाला कोंब येण्याची शक्यता आहे. मात्र कापणीची वेळ होऊन गेली तरीही अद्याप पावसाने विश्रांती घेतली नसल्याने संपूर्ण शेतात उभे असलेले परिपक्व भातपीक सडले आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍याला मदतीची अपेक्षा आहे.
यंदाच्या मोसमात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होता. मात्र काही दिवसांपासून बांदा दशक्रोशीत परतीच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बांदा दशक्रोशीत परतीच्या पावसाचा जोर वाढला. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. कापणी योग्य झालेले भाताचे उभे पीक आडवे झाले. परिणामी भाताच्या लोंब्या गळून पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पंपाच्या साहाय्याने लावणी केली अन् आता कापणी योग्य झालेले पीक मात्र परतीच्या पावसात नासधूस पावत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या पदरी निराशा आल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स