मुणगे हायस्कूलला स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुणगे कारीवणेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर बागवे यांच्याकडून श्री भगवती हायस्कुल मुणगे या प्रशालेला शालेय स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके भेट देण्यात आली. पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित व बिद्धिमत्ता प्रत्येकी तीन सीट व एनएमएमएस परीक्षेसाठी चार संच पुस्तकांचे भेट दिले. यावेळी मुख्याध्यापिका एम बी कुंज, सहा शिक्षक सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन जि वीरकर, हरीश महाले, सौ कुमठेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रसाद बागवे तर आभार मुख्याध्यापिका एम बी कुंज यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)