ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा - श्रावण माजी सरपंच अंकुश लाड.

शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा - श्रावण माजी सरपंच अंकुश लाड.

प्रकाशन: 15 Oct 2022 01:46 PM
वाचन संख्या 149

श्रावण | गणेश चव्हाण :
शेतकर्‍यांच्या तोंडात आलेला घास पावसाने हिराऊन घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वच बाजुने नुकसानग्रस्त झालेल्या, शेतकर्‍यांना आत्महत्येचा विचार स्पर्श करण्या अगोदर सरकारने कोकणांत, ओला दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी श्रावण माजी सरपंच अंकुश लाड यांनी शेतकर्‍यांच्या वतीने केली आहे.

Article image


गेल्या पाच वर्षापासुन नोटबंदी, कोरोना यांमुळे बेजार होऊन, जीवनात विश्व दारीद्र गरीबी व उद्योगधंदे नसल्याने आर्थिक अडचणीत असलेले, हे सर्वसामान्य शेतकरी, आता वन्य प्राणी व किटकांचा त्रास, अतिवृष्टीचा पाऊस तर कधी निसर्गातील बदल यांमुळे कंटाळलेला आहे. रामगड श्रावण परीसरात भातपिक कापणीला आले असुन शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. काही ठिकाणी शेतातच, भात बियाणाला नवे कोंब आले आहेत. भात पिक जाग्यावरच असल्याने डुक्कर, गवारेडे, वानर, ऊंदिर, मोर, पक्षी, किड असे वन्यजीव हाता तोंडाशी आलेले शेत (अन्न) उध्वस्त करतांना पहाव लागत आहे. कर्ज काढुन बि बियाणे खते मजुरदार घालुन शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. काही शेतकरी तर पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे अगदी आत्महत्तेचाही विचार करत आहेत. याचा शासनाने गांभिर्याने विचार करावा व शेतकर्‍यांना वाचवावे अशी मागणी श्रावणचे माजी सरपंच अंकुश लाड यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स