ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
घासलेट काढतेय घाम..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

घासलेट काढतेय घाम..!

प्रकाशन: 12 Oct 2022 07:25 PM
वाचन संख्या 79

ग्रामीण भागातील लाभार्थी केरोसीनपासून वंचित ; शिधापत्रिका धारक नाराज.

तुटपुंज्या कमिशनमुळे वितरकही आहेत हैराण..!

संतोष साळसकर | ब्यरोचीफ : नागरिकांना शिधापत्रीकेवर लाभार्थी ना मिळणारे केरोसीन वितरण होत नसल्याने ग्रामीण भागात अत्यावश्यक असणारे केरोसीन पासून लाभार्थी वंचित किरकोळ केरोसीन वितरक आणि शिधापत्रीकाधारक यांचेमधे वाद निर्माण होत आहेत.

पुरवठा विभाग कार्यालय कडून वितरकाना या बाबत कोणतीही अधिकृत सूचना किंवा आदेश प्राप्त नसल्याने
केरोसीन मिळेल की नाही याबाबत विक्रेते अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शिधापत्रीकाधारक लाभार्थी ना याचे समाधानकारक उत्तरही ते शकत नाहीत.
गेल्या दोन महिन्यांपासून केरोसीन वितरण होत नसल्याने ग्रामीण भागात मोठी समस्यांना निर्माण झाली आहे. केरोसीन चे दर मोठया प्रमाणात वाढत असल्याने या साठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. केरोसीन चा विक्री प्रती लीटर दर शंभरी गाठत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत कमी मिळणारे तुटपुंजे कमिशन यामुळेच वितरण व्यवस्था कोलमडल्याचे काही वितरक यांची प्रतिक्रिया आहे.

शासन धान्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहे. तसेच सणासुदीसाठी वस्तू सार्वजनिक वितरण करण्यात येणार आहे.
परंतु केरोसीनची दर वाढ ही
सर्व सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे.त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती मधून तीव्र नाराजी उमटत आहे.
एकंदरच सध्या सामान्य माणसांचा ‘घासलेट घाम’ काढत असल्याचीच प्रतिक्रिया आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स