ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवलीत मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद निमित्त सरबत वाटप.

कणकवलीत मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद निमित्त सरबत वाटप.

प्रकाशन: 09 Oct 2022 12:41 PM
वाचन संख्या 37

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे जशने ईद-ए-मिलाद उन नबी मुबारक म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी कणकवली पटवर्धन चौक येथे कणकवली तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने देखील मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुसंख्य मुस्लिम बांधव व मराठा बांधव उपस्थित होते.

मुस्लिम बांधवांच्या वतीने आसिफ नाईक यांनी मोहम्मद पैगंबर यांनी समाजासाठी मानवतेची शांततेची व एकात्मतेची शिकवण दिली या शिकवणीला अनुसरून आपण मुस्लिम बांधव मार्ग क्रमांक करत आहोत यापुढे देखील विधायक सामाजिक हिताची कामे आपण चालू ठेवू असे नाईक यांनी सांगितले.

तसेच एडवोकेट रईस पटेल यांनी मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली शिकवण ही आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे त्यांनी समाजामध्ये ऐक्य टिकवावे एकोपा टिकून शांतीचा संदेश दिला त्यांचा आज जन्मदिवस त्यांचं कार्य आपण पुढे असे चालू ठेवणार असे सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने एस टी सावंत यांनी देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि मराठा समाजाच्या मेळावा मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांनी सरबत आणि पाणी वाटप करून मोठे सहकार्य केले त्यामुळे आपण सर्वच समाज एकत्र राहून शांतता टिकवणे व एकत्र राहणे यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत अशाच पद्धतीने लोकहिताचे वेगवेगळे उपक्रम आपण साजरे करूया असे सांगत त्यांनी मुस्लिम बांधवांना इच्छा शुभेच्छा दिल्या यावेळी सोनू सावंत भाई परब एस एस सकपाळ, महेंद्र सामरेकर ,महेंद्र गावकर ,बच्चू प्रभूगांवकर ,सुशील सावंत, सूशांत दळवी, संतोष राऊळ तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने मुराद अली शेख,निसार शेख,आसिफ नाईक ,शानू शाह,निसार काज़ी,आज़ीम कुदालकर,,सलाम पटेल ,सरफराज शेख,असलम निशानदार,एड रईस पटेल,एड अशफ़ाक शेख़,चांदसाब शेख,शदाब शेख़ ,गुलाब ख़ान,सादिक कुदालकर,मुदद्सर मुकादम, शफीक अलगुर,आसिफ पटेल,असलम धारवाडकर् आसिफ निशानदार,बशीर कुरेशी,जाकिर हुडली,शारुख पटेल ,मुन्ना शेख,अब्दुल उड़ियान् यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स