ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील पहिला 'वैकुंठ रथ' कणकवलीत ; नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना .

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील पहिला 'वैकुंठ रथ' कणकवलीत ; नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना .

प्रकाशन: 06 Oct 2022 01:17 PM
वाचन संख्या 60

कै.भाई नलावडे यांच्या लोकसंपर्क वृत्तीला व स्मृतीला अशीही लोकोपयोगी मानवंदना.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून एका नाविन्यपूर्ण लोकोपयोगी प्रकल्पाचे आज लोकार्पण करण्यात आले.

Article image


कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे वडील कै. अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून ५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा ‘वैकुंठरथ’ कणकवली शहराकरिता लोकार्पण करण्यात आला.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील हा अशा प्रकारचा पहिला वैकुंठरथ आहे. कणकवली शहरातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर या व्यक्तीला रुग्णवाहिका किंवा अन्य वाहनाद्वारे अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागते. मृत्यू झालेली व्यक्ती ही गोरगरीब असली तरी मृत्यू झाल्यानंतर देखील त्या व्यक्तीचा आदर राखला जावा तसेच श्रीमंतांसोबत गोरगरिबांना देखील अशा प्रकारे एक सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हा वैकुंठरथ तयार करत त्याचे लोकार्पण केल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. टाटा कंपनीचा छोटा हत्ती हा टेम्पो खरेदी करून त्या टेम्पोमध्ये मॉडिफिकेशन करून हा वैकुंठरथ बनवण्यात आला आहे. कणकवली शहरातील मृत्यू झालेल्या कोणत्याही नागरिकांच्या कुटुंबीयांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून हा वैकुंठरथ अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी दिला जाणार आहे. या वैकुंठ रथामध्ये इंधनासहित चालकाचा खर्च देखील नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. या वैकुंठरथाच्या मागणीकरिता नगराध्यक्ष समीर नलावडे किंवा भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्याशी त्यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कणकवली शहराचे तत्कालीन ग्रामपंचायतचे पाच वर्षे उपसरपंच व त्यानंतर पंधरा वर्षे कंजूमर सोसायटीची चेअरमन राहिलेले अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ जनते च्या सेवेसाठी हा रथ उपलब्ध करण्यात आल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.

या रथाला लाईटची व्यवस्था व ‘जय राम श्रीराम’ श्लोका
ची ऑडिओ क्लिप लावण्यात आली आहे. शिवाजी परब व प्रकाश परब यांच्याकडे चावी सोपवणार व ते संजय मालडकर, दया पारकर, समीर पारकर, आण्णा कोदे, भरत उबाळे, रमेश काळसेकर यांच्यकडे रथाची चावी देणार आहेत. यांना संपर्क साधा असे आवाहन समीर नलावडे यांनी केले.

भाई नलावडे यांचा कणकवली शहराशी असलेला लोकसंपर्क व कणकवली शहरात भाई नलावडे यांची आठवण तेवत रहावी व त्यांच्या राजकीय सहकाम सामाजिक कामाची आठवण राहावी या दृष्टीने हा वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहराबाहेर देखील जिल्ह्यात अन्यत्र जर हा रथ हवा असल्यास इंधनाचा खर्च व चालक यांची व्यवस्था करून हा वैकुंठ रथ न्यायचा आहे व वापर करून झाल्यावर सर्विसिंग करून पुन्हा ताब्यात द्यायचा आहे. मात्र कणकवली शहरातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कणकवली नगरपंचायत जवळ हा रथ ठेवण्यात येणार असून, या रथाचे लोकार्पण आज करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे बंडू गांगण, नगरसेवक विराज भोसले, भरत उबाळे, आण्णा कोदे, संजय मालंडकर, रमेश काळसेकर, समीर पारकर, शिवाजी परब, सदा पारकर, प्रकाश परब आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स