ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला आमदार वैभव नाईक यांच्यासह शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना..!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला आमदार वैभव नाईक यांच्यासह शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना..!

प्रकाशन: 04 Oct 2022 08:03 PM
वाचन संख्या 90

कुडाळ | देवेंद्र गावडे : शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांना ऐकण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आज सायंकाळी मुंबई येथे जाण्यासाठी रवाना झाले.
दसरा मेळाव्याच्या उत्साहाने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातारण असून मुंबई येथे जाण्यासाठी निघालेल्या शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी कुडाळ, ओरोस, व कणकवली रेल्वेस्टेशनवर घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.

शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो, आदित्य ठाकरे यांचा विजय असो, आमदार वैभव नाईक यांचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

एक नेता, एक झेंडा, एक मैदान अशा संकल्पनेवरील पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळावा उद्या ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर येथे संपन्न होणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर झालो आहोत असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले व हा मेळावा न भूतो न भविष्यती असेल असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुकासंघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,जयभारत पालव, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,अतुल बंगे, मंदार केणी, किरण शिंदे, पंकज सादये, उदय मांजरेकर, बाळा कोरगावकर, दीपक आंगणे, अवधूत मालंडकर, राजू गवंडे,अनुराग सावंत, संदीप म्हाडेश्वर, भाऊ चव्हाण, अमित भोगले, मंदार ओरोसकर, संजय भोगटे, समीर लब्दे, बाळू पालव,सचिन कदम, संतोष पाटील, सागर भोगटे, बाबा सावंत, अमित राणे, विनायक परब, गुरु गडकर, गंगाराम सडवेलकर, बाबू टेंबूलकर,अरुण परब, नंदकिशोर परब, जगदीश राणे, भूषण कुडाळकर, संदेश सावंत, प्रमोद ठाकूर, सागर माळगी, राजू घाडी, विरेश परब आदींसह शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत.
याप्रसंगी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, सचिन सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रामू विखाळे,अँड.हर्षद गावडे,प्रसाद अंधारी, सचिन आचरेकर,रिमेश चव्हाण,बंडू ठाकूर, महेश कोदे, विलास गुडेकर, प्रदीप मसुरकर, समीर परब, योगेश मुंज,विनायक हडकर, अजित काणेकर,अवी सावंत स्वप्नील पाटील, रुपेश आमडोस्कर, दीपक गुरव, गुरु पेडणेकर,सचिन राणे,विलास गुडेकर,महानंद चव्हाण,ओमकार चव्हाण,मिलिंद आईर, उत्तम वाळके, ईरा गावडे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स