ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्राणजीवन सहयोग संस्थेचा वतीने दिल्या जाणार्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले तन्मय गावडे व मंदार परब..!

प्राणजीवन सहयोग संस्थेचा वतीने दिल्या जाणार्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले तन्मय गावडे व मंदार परब..!

प्रकाशन: 04 Oct 2022 05:27 PM
वाचन संख्या 40

कणकवली | ब्युरो न्यूज : विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची, वेगवेगळ्या स्पर्धांची गरज असते. असेच कार्य मागील काही वर्षांपासून प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केले जाते.

दरवर्षी प्राणजीवन सहयोग संस्थेच्यावतीने दिला जाणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मागील कोरोना आजार संक्रमणामुळे वितरीत केला गेला नव्हता.
यंदा मात्र श्री देवी सरस्वती पूजनाचे औचित्य साधून संस्थेचे सदस्य प्रशांत गावडे यांच्या माध्यमातून जि. प. शाळा. हळवल क्र. २ येथे २०/२१ वर्ष चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. तन्मय लक्ष्मण गावडे याला देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच २१/२२ वर्ष चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. मंदार मधुकर परब याला देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुतार, सहकारी शिक्षक श्री. सावंत, मा उपसरपंच, लक्ष्मण उर्फ प्रदिप गावडे, प्रशांत गावडे, सतीश गावडे, सिद्धेश परब, विजय परब ग्रामपंचायत सदस्या, सुजाता परब आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम जि. प. शाळा. हळवल नं. २ येथे संपन्न झाला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स