ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
‘इग्नू’मधील ज्योतिष अभ्यासक्रम कायम ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने घेतली राज्यपालांची भेट !

‘इग्नू’मधील ज्योतिष अभ्यासक्रम कायम ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने घेतली राज्यपालांची भेट !

प्रकाशन: 04 Sep 2021 08:28 PM
वाचन संख्या 41

ज्योतिषशास्त्र विज्ञानाधिष्ठीतच; अभ्यासक्रमाला राज्यपालांचा पाठिंबा !

कणकवली / उमेश परब – ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठा’त (इग्नू) ज्योतिषशास्त्रविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करण्याला काही तथाकथित पुरोगामी आणि नास्तिक मंडळींकडून होणार्‍या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर 4 सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि कुलपती मा. भगतसिंह कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवनात भेट घेतली. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाचे म्हणणे सविस्तर ऐकून राज्यपालांनी ‘‘ज्योतिषशास्त्र हे केवळ शास्त्र नसून विज्ञान आहे. ते जगभरात शिकवले जाते. न्यायालयाने ज्योतिषशास्त्राची सत्यता अधोरेखित केली असतांना त्याला कोण विरोध करू शकतो ? तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा, मी पहातो’’, असे आश्‍वासन देत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रम शिकवण्याला पाठिंबा दर्शवला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी, मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, गौंड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे आणि श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले हे उपस्थित होते.

     सर्वोच्च न्यायालयाने ज्योतिषशास्त्राच्या विरोधातील दावा फेटाळतांना ‘काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’, अशी टिपण्णी दिली आहे. या संदर्भातील निवेदन श्री. रमेश शिंदे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले आणि याविषयीची सविस्तर माहितीही दिली. ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’त ज्योतिषशास्त्र शिकवण्याचा निर्णय कायम ठेवण्याची विनंती या वेळी समितीच्या वतीने राज्यपालांना करण्यात आली. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

   श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राशी विसंगत असलेल्या कृत्रिम हौदांना प्रोत्साहन देणे बंद करून शासनाने शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन द्यावे, तसेच हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठी जागतिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करावी, याविषयीची निवेदने राज्यपालांना देण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स