ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा जाहीर..!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा जाहीर..!

प्रकाशन: 03 Oct 2022 06:59 PM
वाचन संख्या 126

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण ७ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
७ ऑक्टोबर २०२२रोजी सकाळी ८.३० ला कुडाळ येथे कोकणकन्याने आगमन, त्यानंतर १० ते १०.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकप्रतिनिधी बैठक, १०.३० ते ११.३० जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक होणार आहे.

११.३० ते १२.३० सावंतवाडी विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक, १२.३० ते १.३० कुडाळ विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक होणार असून या दोन्ही बैठका वसंतस्मृती कार्यालय ओरोस येथे होणार आहेत.

१.३० ते २.३० राखीव २.३० ते ३.३० कणकवली विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे होणार आहे. तरी भाजपा सर्व पदाधिकारी यांनी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ला कुडाळ रेल्वे स्थानक येथे स्वागतासाठी व वरील संघटनात्मक बैठकीना उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स