ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
उमेद फाऊंडेशनकडून एक पणती वंचितांच्या दारी उपक्रमाचे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

उमेद फाऊंडेशनकडून एक पणती वंचितांच्या दारी उपक्रमाचे आयोजन.

प्रकाशन: 02 Oct 2022 05:38 PM
वाचन संख्या 244

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फाऊंडेशनने याही वर्षी एक पणती वंचितांच्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्यावर्षी उमेद फाऊंडेशन च्या वतीने शंभर गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला होता.
उमेद फाऊंडेशनच्या वतीने या वंचित घटकांना कपडे, पणत्या,आकाश कंदील, दिवाळी फराळ देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात आपला मोलाचा हातभार लावावा.या उपक्रमात सहभागी होतानाआपल्याला जर नवी/जुनी कपडे द्यावयाची असतील तर आपण कृपया शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर या तारखेपर्यंत उमेद फाऊंडेशन सदस्यांकडे पोहोच करावीत आपल्याला स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ /पणत्या/ आकाशकंदील असे दिवाळी उपयुक्त साहित्य द्यावयाचे असल्यास आपण उमेद फाउंडेशन कडे दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत पोहोच करावे.
फराळासाठी आर्थिक मदत आपण ऑनलाइन स्वरूपात/ रोख स्वरूपात केव्हाही उमेद फाऊंडेशनकडे अकाउंट वर जमा करू शकता.
आर्थिक मदत एका कुटुंबासाठी फराळ ३०० रू. ,
दोन कुटुंबासाठी फराळ ६०० रू
या टप्प्यात स्वीकारली जाईल
जमा झालेल्या ३०० रु. मदतीतून खालील प्रकारे १ किट बनविण्यात येईल.अंघोळीचा साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील , पणत्या, लाडू (250 ग्रॅम) चिवडा(500ग्रॅम) शंकरपाळी (250 ग्रॅम), चकली ( 250 ग्रॅम ) इ. आपण दिलेली मदत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे, जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम येथे वितरित केली जाणार आहे pay/Phone pay 9922633365 या खात्यावर किंवा संस्थेशी संपर्क करुन जमा करू शकता येइल असे आवाहन करण्यात आले आहे.
वंचितांची दिवाळी तेजोमय करणेसाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन उमेद फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स