ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा विभाग शिवसेनेच्या वतीने पळसंब गांवचे आदर्श सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या सत्काराचे आयोजन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा विभाग शिवसेनेच्या वतीने पळसंब गांवचे आदर्श सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या सत्काराचे आयोजन..!

प्रकाशन: 02 Oct 2022 02:18 PM
वाचन संख्या 165

आज रात्री ०८:३० वाजता पळसंबच्या श्री आई देवी जयंती मंदिरात होणार सत्काराचा कार्यक्रम.

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते होणार सत्कार ; शिवउद्योग तालुका प्रमुख मंगेश गांवकर असणार विशेष उपस्थित…!

आमदार वैभव नाईक यांनी केलेय विशेष अभिनंदन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे आदर्श सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांचा शिवसेना आचरा विभागातर्फे सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
आज रात्री ८:३० वाजता हा सोहळा पळसंब गांवच्या श्री.आई जयंती देवी मंदिरात संपन्न होईल.

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि शिवउद्योग तालुका प्रमुख मंगेश गांवकर तसेच आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे व इतर शिवसैनिक,पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न होईल.

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची नुकतीच सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्कार सोहळ्याला आचरा विभागातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स