ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पर्यटन व्यावसायिक महासंघाचा 'पर्यटन मित्र' पुरस्काराने गौरव..!

पर्यटन व्यावसायिक महासंघाचा 'पर्यटन मित्र' पुरस्काराने गौरव..!

प्रकाशन: 30 Sep 2022 08:51 PM
वाचन संख्या 176

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी मानले राज्य सरकारचे आभार.

मालवण | सुयोग पंडित : गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत विविध शिबिरे, उपक्रम,जागृती,चर्चासत्रे तसेच पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी कटीबद्धतेचा संदेश घेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ कार्यरत आहे. त्याची आता राज्य सरकारने दखल घेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघाला ‘पर्यटन मित्र’ पुरस्काराने गौरविले आहे.

पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणातील पर्यटन वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित असून बीच टुरिझम सोबतच हिस्ट्री ,कल्चर ,मेडिकल,हेरिटेज,फूड टुरिझम च्या माध्यमातून कोकणामध्ये बारमाही पर्यटन चालू होऊ शकते तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसायात येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्यासाठी कार्य करत आहे . दोन वर्षाच्या कोरोना नंतर पर्यटन व्यवसाय पूर्व पदावर येताना व्यावसायिकांना आवश्यक असलेली ट्रेनींग आर्थिक उभारणीसाठी महासंघातर्फे प्रयत्न केले जात असून या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारचा पर्यटन संचालनालय मार्फत दिला जाणारा पर्यटन मित्र पुरस्कार जागतिक पर्यटन दिनी वेंगुर्ला येथे झालेल्या पर्यटन चर्चासत्र कार्यक्रमात माजी आमदार व माजी उपाध्यक्ष पर्यटन संचालनालय श्री प्रमोद जठार ,श्री संजय ढेकणे वरिष्ठ प्रादेशिक पर्यटन अधिकारी कोकण, प्रशांत वाणी पर्यटन संचालनालय कर्नल श्री.सुधीर सावंत माजी आमदार राजनजी तेली यांच्या उपस्थित देण्यात आला.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री. विष्णू मोंडकर यांनी या पुरस्कार प्राप्तीनंतर सांगितले की महासंघाच्या कोकण क्षेत्रात चालू असलेल्या कार्याची दखल राज्य सरकारने घेतली त्याबद्दल महासंघ राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो व येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकांना भेडसविणारे प्रश्न प्रामुख्याने सरकारने मार्गी लावावे हीच अपेक्षा आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स