ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पशुवैद्यकीय विभागाला भेट देत घेतला आढावा.

आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पशुवैद्यकीय विभागाला भेट देत घेतला आढावा.

प्रकाशन: 28 Sep 2022 09:25 PM
वाचन संख्या 36

लंपी आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेऊन केली चर्चा.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तालुका पशुवैद्यकीय विभागाला भेट दिली. सध्या गुरांना होणाऱ्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर व लसिकरणाबाबत परिपंर्ण आढावा घेतला. सद्यस्थितीत राज्यभर जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आहे.कोकणपट्याच्या तुलनेत घाटमाथ्यावर हा आजार अधिक वाढला आहे.त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी केल्या.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर ठाकुर म्हणाले की कुडाळ तालुक्यात लंपीचा अद्यापपर्यंत प्रादुर्भाव नाही आणि लम्पी आजार आलाच तर तो बरा होतो. जनावरे मरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुका संघटक बबन बोभाटे, अनुप नाईक, शेखर गावडे,बाळा कोरगावकर,सुनील सावंत,सचिन कदम,दीपक आंगणे, योगेश धुरी बाबी गुरव आदि उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे काही अडचणी आहेत का,आतापर्यंत किती जनावरांना लसिकरण झाल, याबाबत आमदार नाईक यांनी परिपंर्ण माहीती घेतली.यावेळी डॉ.ठाकुर म्हणाले की तालुक्यात एकुण ३५ हजार जनावरे आहेत.त्यामध्ये गायवर्गिय जनावरे आहेत त्यांनाच लसिकरण करावयाचे आहे.या ३५ हजार मध्ये १९ हजार जनावरे गाय वर्गिय आहेत. त्यात ४ हजार जनावरे गाबण व वासरे आहेत. उर्वरित १५ हजार जनावरांपैकी ६३०० जनावरांना लसी दिल्या आहेत.आता ८७०० जनावरांना लसी देणं बाकी आहे. सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यात राज्य शासनाचे ८ आणि जिल्हा परिषदेचे १२ मिळुन २० दवाखाने कुडाळ तालुक्यात आहेत.आता १३ जनाच्या सहकार्याने तालुक्यात लसिकरण सुरू आहे. सन २०१९ मध्ये लम्पी आजार सिंधुदुर्गात आला होता त्यावेळी ८० टक्के जनावरांना लागण झाली होती. आता मात्र लंपी येणार नाही अशी खात्री आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन यावेळी डॉ.ठाकुर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स