ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कांदळगाव मध्ये कायमस्वरूपी तलाठी हवा..!

कांदळगाव मध्ये कायमस्वरूपी तलाठी हवा..!

प्रकाशन: 28 Sep 2022 08:22 PM
वाचन संख्या 96

सरपंच सौ.उमदी परब यांनी दिले निवेदन…!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
कांदळगाव, शेमाडराणेवाडी व महान या गावासाठी कायमस्वरुपी तलाठी देण्याची मागणी कांदळगाव सरपंच सौ. उमदी उदय परब यांनी निवेदनाद्वारे मालवण तहसील कार्यालय येथे केली.
कांदळगाव शेमाडराणेवाडी व महान या महसुली गावांना गेली अनेक वर्षे कायमस्वरुपी स्वतंत्र तलाठी उपलब्ध होते.त्यामुळे महसुली गावाचे 7/12 दाखले, उत्पन्न दाखले, वारस तपास व विविध शासकीय योजना कामे सुरळीत पणे होत होती. ग्रामस्थांची कोणतीही कामे खोळंबत नव्हती. परंतु गेली तीन वर्षे इतर तलाठी यांच्यावर सदर सजाचा कार्यभार सोपविण्यात येत असून सदर तलाठी नेमून दिलेल्या दिवशी गावामध्ये नियमित उपलब्ध होत नाहीत. यामुळे गावातील ग्रामस्थांची कामे खोळंबत आहेत. कांदळगाव, शेमाडराणेवाडी व महान या गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरुपी पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच आनंद आयकर, श्रुतिका कुंभार, राहुल पराडकर,दिनकर सातार्डेकर, भूषण सुर्वे, आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स