ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शेठ म.ग. हायस्कूल चे माजी पर्यवेक्षक तानाजी पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शेठ म.ग. हायस्कूल चे माजी पर्यवेक्षक तानाजी पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न...!

प्रकाशन: 26 Sep 2022 06:06 PM
वाचन संख्या 66

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शेठ म .ग. हायस्कूल देवगडचे माजी पर्यवेक्षक तानाजी पाटील यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा प्रदान सोहळा देवगड हायस्कूल येथे संपन्न झाला.
शेठ म .ग. हायस्कूल देवगड येथे कार्यरत असलेले माजी पर्यवेक्षक तानाजी पाटील यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा प्रदान सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक संजीव राऊत पर्यवेक्षक घस्ती , माजी मुख्याध्यापक, संस्थेचे सन्माननिय पदाधिकारी चंद्रकांत शिंगाडे , सत्कारमूर्ती तानाजी पाटील त्यांच्या सुविदयपत्नी व कन्या ऋजुता पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना तानाजी पाटील यांनी एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे सदभाग्य आहे. मी माझ्या परीने माझ्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत प्रशालेतील सर्व शिक्षक , शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मला सहकार्य केले. याबददल त्यांनी ऋण व्यक्त केले.
माजी पर्यवेक्षक तानाजी पाटील हे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांची एकूण सेवा ३५ वर्षे ३ महिने झाली. त्यापैकी वा.ल. विद्यालय माणगांव तालुका कुडाळ येथे १ वर्ष व देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित अ. कृ. केळकर वाडा हायस्कूल ३४ वर्षे ३ महिने व देवगड हायस्कूल मध्ये १ वर्षे ४ महिने सेवा केली. या प्रदिर्घ सेवेत अनेक विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवण्याचे कार्य त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घस्ती सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्तविकेत तानाजी पाटील यांच्या सेवा काळात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या शांत व संयमी स्वभावाचे वर्णन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते तानाजी पाटील यांचा सपत्नीक शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून यथोचित सत्कार करण्यात आला .
प्रशालेतील काही निवडक विद्यार्थ्यांनी सत्कार मूर्ती पाटील सर यांच्या विषयी च्या आठवणीना उजाळा दिला व त्यांना पुढील निरोगीआयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक राऊत सर याठी त्याच्या विषयी काही आठवणी व स्वभाव वैशिष्टे सांगितले माजी मुख्याध्यापक व सन्माननिया पदाधिकारीचंद्रकांत शिंगाडे यांनी अध्यक्षीय भाषण करताना तानाजी पाटील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते . त्यांना दिलेली कामगिरी ते उत्तमपणे पार पाडत होते असे त्यांच्याविषयी गौरव गार काढले आहे व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार सौ. पल्लवी पंडीत यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स