ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी महापौरांच्या मुलाला दिव्यांग असल्याने विमानात प्रवेश नाकारला ; मूळ बांदिवडे गांवचे सुपुत्र.

माजी महापौरांच्या मुलाला दिव्यांग असल्याने विमानात प्रवेश नाकारला ; मूळ बांदिवडे गांवचे सुपुत्र.

प्रकाशन: 21 Sep 2022 08:29 PM
वाचन संख्या 196

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : दिव्यांग असल्याने आपल्याला व्हिएटजेट इंडिया ( Vietjet India ) एअरलाइन्सने विमानात प्रवेश नाकारल्याची माहिती भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष व बांदिवडे गावचे सुपुत्र अरविंद प्रभू यांनी दिली आहे.
सदर धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला आहे. बाली येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी निघालेल्या भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . या प्रकारामुळे प्रभू व्यथित झाले आहेत .
बाली येथे २० ते २४ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा होत असून या स्पर्धेत भारतासह जगभरातील १६ देश सहभागी होणार आहेत . अरविंद प्रभू हे माजी आमदार आणि मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे चिरंजीव आहेत . ९५ टक्के दिव्यांग असलेले अरविंद प्रभू व्हीलचेअरवर असतात . परदेशात विमानाने जायचे असेल तर त्यांच्याबरोबर अटेंडंट घेऊनच ते प्रवास करतात . पिकलबॉलच्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी रात्री बालीला रवाना झाला . अरविंद प्रभू आणि त्यांच्या चार अटेंडंटचे खेळाडूंच्या विमानानंतर एका तासाने रात्री १.२५ चे विमान होते . त्यासाठी ते शनिवारी रात्री १० वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले . चेकिंग काउंटरवर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने प्रभू यांचा बोर्डिंग पास न देता त्यांच्यासोबत असलेल्या चार जणांचे बोर्डिंग पास दिले . लो कॉस्ट एअरलाइन्स असल्याने दिव्यांगांसाठी केबिन चेअर नसल्याचे सांगत प्रभू यांना प्रवास करता येणार नाही , असे व्हिएतनामच्या कर्मचाऱ्याने सांगितले .
अरविंद प्रभू यांनी या प्रवासासाठी पाच लाख रुपये खर्च केले होते . विमानात प्रवेश नाकारल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले असता रीतसर तक्रार करा त्यानंतर बघू असे सांगण्यात आले अशी माहिती प्रभू यांनी दिली .
इतर चार जणांना आम्ही प्रवास करण्यास अडवले नव्हते . त्यामुळे त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार नाहीत , असे उत्तर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सने दिले .
प्रभू पुढे म्हणतात, मागील ३५ वर्षात अनेक देशांचा प्रवास आपण केला आहे . दिव्यांग असल्याने मला नेहमी अटेंडंट घेऊन जावे लागतात . त्यामुळे मी लो कॉस्ट एअरलाइन्सनेच प्रवास करतो . याआधी मला कधीच विमान प्रवासापासून रोखण्यात आले नव्हते. सदर प्रकार प्रथमच घडल्याने प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स