मुणगे येथे आज दशावतार नाट्यप्रयोग..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालय येथे सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त आज शनिवार १७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. देवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मुणगे -देवगड -मुंबई चे मालक प्रकाश लब्दे आणि सहकलाकार यांचा कै.आबा लब्दे यांच्या स्मरणार्थ ” मयूरेश्वर महिमा ” हा दशावतारी नाट्य प्रयोग संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. उपस्थितीचे आवाहन ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)