ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली शाळा क्र.३ ची उत्तम कामगिरी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली शाळा क्र.३ ची उत्तम कामगिरी.

प्रकाशन: 16 Sep 2022 03:40 PM
वाचन संख्या 62

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा क्र,. ३ कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल असे यश संपादन केले आहे. नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यामध्ये शाळा कणकवली क्रमांक तीनच्या संतोषी सुशांत आळवे व भालचंद्र रवींद्र सावंत या विद्यार्थ्यांनी माझे शेत सुरक्षित शेत ही प्रतिकृती सादर केली होती या प्रतिकृतीचा विद्यार्थी प्रतिकृती इयत्ता सहावी ते आठवी गटात द्वितीय क्रमांक आला त्यांना शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभले विज्ञान नाट्योत्सव २०२२ -२३  यामध्ये शाळा कणकवली क्रमांक तीन ने स्वच्छतेतून समृद्धीकडे ही नाटिका सादर केली या नाटिकेचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक आला त्याचबरोबर शाळा कणकवली क्रमांक तीन चे उपशिक्षक  लक्ष्मण मधुकर पावसकर यांचा शिक्षक प्रतिकृती प्राथमिक गटात तृतीय क्रमांक आला त्यांनी विज्ञान या विषयातील स्वच्छता आणि आरोग्य ही प्रतिकृती सादर केली होती.


     
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा वामन करंबेळकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  रवींद्र सावंत उपाध्यक्ष सौ सायली राणे सदस्य सौ. साक्षी आळवे व इतर सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे शाळेने मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल विद्यार्थ्यांचे पालक वर्गाकडून विशेष कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स