ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कसबा मसुरे गांव रहाटीच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

कसबा मसुरे गांव रहाटीच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 15 Sep 2022 08:24 PM
वाचन संख्या 68

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कसबा मसुरे गांव रहाटीचे विविध धार्मिक कार्यक्रम २३ सप्टेंबर पासून सुरू होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मसुरे देवस्थानचे प्रमुख श्री बाबुराव प्रभू गांवकर आणि श्री संग्राम प्रभू गांवकर यांनी केले आहे.

शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५:३० वाजता गांव राहाटीची आठची अवसरी घडी स्थळ बाळासाहेब प्रभुगांवकर यांच्या घरी संध्याकाळी ०७:०० वाजता मसुरे मर्डे येथे उभादेव डाळप.
सोमवार २६ सप्टेंबर सकाळी दहा वाजता श्री देवी माऊली मंदिर मसुरे देऊळवाडा येथे घटस्थापना.
मंगळवार ४ ऑक्टोबर सायंकाळी साडेचार वाजता आठाची अवसरी घडी स्थळ रवळनाथ मंदिर मसुरे गावठाण वाडी. सायंकाळी सात वाजता मसुरे मेढा पवणाई मंदिर येथे सर्व देवता तरंगांना निरी लावणे विधी.
बुधवार पाच ऑक्टोबर सायंकाळी तीन वाजता श्रीदेवी पावणाई मंदिर मसुरे मेढा येथे विजयादशमी दसरा उत्सव, गुरुवार ६ ऑक्टोबर श्रीदेवी माऊली मंदिर मसुरे देउळवाडा येथे सायंकाळी तीन वाजता एकादशी दसरा उत्सव. शुक्रवारी ७ ऑक्टोबर ला सकाळी नऊ वाजता श्री सिद्धनाथ मंदिर किल्ले भरतगड येथील दसरा उत्सव,सायंकाळी तीन वाजता श्री देवी पावणाई मंदिर मसुरे मेढा वाडी येथे आठाची अवसरी घडी, रविवार दिनांक ९ ऑक्टोबर नवानभक्षण दिन साजरा होणार आहे.
गांव रहाटीशी संबंधित सर्व मानकरी, स्थळकरी, मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ यांनी मसुरे गावराटीच्या नियमानुसार लागणाऱ्या सामग्रीसह वेळीच उपस्थित राहावे आणि सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स