विश्रांतीने बसायला नागरिकांना ठीक ठिकाणी बॅंचेस
वैभव माणगावकर / मालवण : मालवण नगरपालिकेच्या वतीने माजी बांधकाम सभापती यतीन खोत, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तसेच विद्यमान बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या नियोजनातून मालवण शहरात ठिकठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बेंच बसविण्यात येत आहेत. मालवण भरड नाका येथे दत्त मंदिर या ठिकाणी बेंच बसवून या कामाचा शुभारंभ नगरसेवक यतीन खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हे बेंच सिमेंटचे आहेत. मालवण शहरातील प्रत्येक वॉर्डाच्या नगरसेवक व नागरिकांच्या मागणीनुसार प्रत्येकी दोन बेंच बसविण्यात येणार आहेत. ठीक ठिकाणी विश्रांतीसाठी बसण्यासाठी नागरिकांना या बेंचचा उपयोग होणार आहे, असे नगरसेवक यतीन खोत यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)