ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग बँकेच्या मसुरे शाखेच्या वतीने वाहन कर्ज पुरवठा..!

सिंधुदुर्ग बँकेच्या मसुरे शाखेच्या वतीने वाहन कर्ज पुरवठा..!

प्रकाशन: 04 Sep 2022 05:23 PM
वाचन संख्या 91

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेच्या वतीने वाहन कर्ज घेतलेल्या तिघांना जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या उपस्थितीत उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, शाखाधिकारी संतोष गावकर, शिवराज सावंत, बँक कॅशीयर महेश गुराम, लिपिक विनीत लुडबे, शरद ठाकूर, आदर्श शिक्षक शिवराज सावंत, प्रशांत परब, सौ गौरी चव्हाण, रोहन म्हाडगुत आदी उपस्थित होते. बँकेच्या विविध योजनांचा शेतकरी तसेच व्यावसाईक यांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी बाबा परब यांनी केले. मसुरे शाखेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या ग्राहकाभिमुख व तत्पर सेवे बद्दल यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले. आभार शाखाधिकारी संतोष गावकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स