ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे देऊळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत दादू परब यांचे निधन.

मसुरे देऊळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत दादू परब यांचे निधन.

प्रकाशन: 03 Sep 2022 06:35 PM
वाचन संख्या 56

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे देऊळवाडा वेताळ टेंब येथील प्रतिष्ठित सामजिक कार्यकर्ते गणपत दादू परब वय ७४ वर्ष यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गणपत परब यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
गणपत परब यांचे मुंबई तसेच गावातील विविध संस्था तसेच सोसायटी मध्ये योगदान होते. मसुरे पतपेढी मुंबई चे माझी अध्यक्ष, परब मराठा मंडळाचे सभासद, बागवे संस्थानचे सभासद, मसुरे येज्युकेशनचे सभासद होते तसेच नाट्य कलावंत, क्रीडक्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. गावामध्ये सर्वांशी त्यांचे आदराचे आणि सलोख्याचे वागणे होते. लहानथोर. अबालृद्धांमध्ये ते प्रिय होते. मुंबईत असताना गावातील गरजूंना त्यांनी आपण काम करत असलेल्या खाजगी कंपनीत नोकऱ्या दिल्या होत्या. त्यांच्या निधनाने सामजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, चुलत भाऊ, एक मुलगा, दोन मुली, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. तुषार परब यांचे ते वडिल होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स