ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वैभववाडी तालुक्याच्या शैक्षणिक दर्जाला मुंबई विद्यापीठाची सन्मानाची मोहोर..!

वैभववाडी तालुक्याच्या शैक्षणिक दर्जाला मुंबई विद्यापीठाची सन्मानाची मोहोर..!

प्रकाशन: 03 Sep 2022 06:06 PM
वाचन संख्या 53

महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था संचालित आंनदीबाई रावराणे महाविद्यालय ठरले ‘सर्वोत्कृष्ट ‘ ग्रामीण भागातील महाविद्यालय.

5 सप्टेंबरला सांताक्रुझ मुंबईत होणार पुरस्काराचे वितरण.

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यासारख्या ग्रामीण आणि खडतर भागातील गोरगरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना उच्च शिक्षणाची सोय करणाऱ्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा ‘ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर’ झाला आहे. या निमित्ताने वैभववाडी तालुक्यातील शैक्षणिक दर्जावर मुंबई विद्यापीठाची सन्मानाची मोहोर उमटल्याची प्रतिक्रिया वैभववाडी तालुक्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था संचालित आंनदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी
येथील ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी ह्या सुसंस्कृत, सभ्य आणि सक्षम नागरिक होण्यासाठी उच्च शिक्षण देण्याचे महान कार्य करीत आहे.या कॉलेजने गेली कित्येक वर्षे आपल्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवून अनेक स्पर्धेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे.

या बाबत कॉलेजचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत काकडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की , मुंबई विद्यापीठातील ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट कॉलेज कोणते ?याची चाचणी http://localhost/news/public/uploads/2020-2021 या वर्षांत मुंबई विद्यापीठ मार्फत घेण्यात आली होती.ही चाचणी शहरी व ग्रामीण वर्गातील दर वर्षी घेतली जाते.यात महाविद्यालयातील सुखसोई उदाहरणार्थ इमारत, वर्गखोल्या, बैठक व्यवस्था, डिजिटल व्यवस्था सेमिनार हॉल, सांस्कृतिक हॉल, खेळाचे मैदान ,कार्यालयीन सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा इ. तसेच ऍकेडेमिक रेकॉर्ड,नॅक ने दिलेले ‘ए ‘ मानांकन, विविध नवीन सुरू केलेले कोर्सेस, पेपर तपासणी मध्ये महाविद्यालयाचा सहभाग, संशोधना मधील सहभाग, संशोधन पेपर प्रसिद्धी, विद्यापीठाच्या विविध समितींवर महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सहभाग , क्लस्टर कॉलेजमध्ये लीड महाविद्यालय म्हणून असलेला सहभाग, राष्ट्रीय सेवा योजना ,अविष्कार ,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असलेला सहभाग इत्यादी बारीक सारीक सर्व बाबी तपासून पाहिले गेले.त्यात कॉलेजने त्यातील सर्व शर्ती आणि अटी पूर्ण केल्या.तेव्हा ठाणेग्रामीण,पालघर,रायगड,रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग या ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून अवार्ड या कॉलेजला जाहीर झाला आहे,अशी माहिती काकडे यांनी दिली आहे.

सोमवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी ,फिरोजशहा मेहता ऑडिटोरियम हॉल,मुंबई विदयापीठ,सांताक्रूझ (पूर्व )मुंबई येथे सकाळी 9 वाजता एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.कॉलेजचे प्राचार्य,प्राध्यापक,
कर्मचारी आणि विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स