ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोकणचे रस्ते खड्डेमुक्त करा ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांची मागणी.

कोकणचे रस्ते खड्डेमुक्त करा ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांची मागणी.

प्रकाशन: 02 Sep 2022 11:22 AM
वाचन संख्या 128

शाश्वत पर्यटन वाढीसाठी नूतन सा.बां. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी सदिच्छा भेटीदरम्यान पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकार्यांची विशेष उपस्थिती .

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पदी कोकणचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या व टी टी डी एस च्या पदाधिकांऱ्यानी मंत्री महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी कोकणात पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामीण व शहरी पर्यटन स्थळावर पोचण्यासाठी खड्डेमुक्त व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती होण्यासंबंधी कार्यवाही व्हावी अशी विनंती करण्यात आली. मागील सरकारच्या काळात बंदर विकास मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोकणात नव्याने बंदरजेटींची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी नव्याने उभारण्यात आलेली जेटी अश्या प्रकारच्या अनेक जेटीमुळे कोकणात सुरक्षित जलपर्यटन होण्यास मदत झाली आहे कोकणातील मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांच्या मुळे बहुचर्चित मुंबई गोवा मार्ग तसेच पर्यटन वाढीसाठी आवश्यक रस्त्यांचे जाळे कोकणात निर्माण होईल तसेच सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. ही माहिती महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली. यावेळी महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, मालवण वाहतूक आघाडी तालुका अध्यक्ष किसन मांजरेकर, टी.टी डी.एस अध्यक्ष सहदेव साळगांवकर, रवींद्र खानविलकर, दादा वेंगुर्लेकर, रामा चोपडेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स