ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांनी घेतली सा.बां.मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट.

माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांनी घेतली सा.बां.मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट.

प्रकाशन: 25 Aug 2022 07:10 PM
वाचन संख्या 559

मालवण ते कसाल व मालवण ते आंगणेवाडी रस्ता लवकरात लवकर करायचे दिले निवेदन.

मालवण | विनीत मंडलिक : माजी खासदार व भाजपा युवानेते डाॅ. निलेश राणे यांनी माननीय रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री सार्वजनिक बांधकाम यांची भेट घेऊन ‘मालवण ते कसाल’ व तसेच ‘मालवण ते आंगणेवाडी’ रस्ता लवकरात लवकर करण्याची विनंती केली .


मालवण शहर हे पर्यटन शहर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात .तसेच कोकणातील मोठी जत्रा म्हणजे भराडी मातेची आंगणेवाडी जत्रा यावेळी लाखो भाविक आंगणेवाडी जत्रेला येत असतात . त्यांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून लवकरात लवकर हा रस्ता करण्यात यावा अशी विनंती माननीय रवींद्र चव्हाण यांना केली .
माननीय रवींद्र चव्हाण यांनी मालवण आंगणेवाडी रस्ता याची निविदा काढली असून लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले . तसेच मालवण कसाल रस्ता यांची लवकरात लवकर निविदा काढण्यासाठी प्रयत्न करून प्रथम प्राधान्याने रस्ता करण्याचे सूचित केले .

अशोक सावंत ( भाजपा,सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस )
Article image
विजय केनवडेकर (मालवण शहर प्रभारी )
गणेश कुशे ( माजी नगरसेवक,मालवण न.प.)

यावेळी डाॅ.निलेश राणे तसेच भाजपा सिंधुदुर्ग सरचिटणीस अशोक सावंत,मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर व मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश कुशे उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स