ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>सैनिक दलातून निवृत्त होऊन 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच सडूरे शिराळे ग्रामपंचायत ने केलेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी - माजी सैनिक सुरेश पवार.</em>

<em>सैनिक दलातून निवृत्त होऊन 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच सडूरे शिराळे ग्रामपंचायत ने केलेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी - माजी सैनिक सुरेश पवार.</em>

प्रकाशन: 17 Aug 2022 11:01 AM
वाचन संख्या 135

वैभववाडी | प्रतिनिधी : भारत देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे रहिवासी माजी सैनिक श्री सुरेश पवार हे उपस्थितीत होते. श्री पवार यांच्या शुभहस्ते 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत पहिल्यांदाच देशाच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या सैनिकाच्या शुभहस्ते ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी बोलत असताना श्री पवार म्हणाले सतरा वर्ष विविध ठिकाणी भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी केले, वाघा बॉर्डर असो काश्मीर असो अगदी आमच्या गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे ज्या भागात देशाचे संरक्षण करताना शहीद झाले त्या ठिकाणी देखील पाच वर्ष मी सेवा बजावली सतरा वर्ष सेवा बजावल्यानंतर मी सेवानिवृत्त झालो. आज सेवानिवृत्त होऊन 21 वर्ष पूर्ण झाले परंतु 21 वर्षानंतर माझ्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये माझा पहिल्यांदा सन्मान करण्यात आला. हा सन्मान नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल माझ्यातील शक्ती वाढवे असा पवार यांनी विश्वास व्यक्त केला. देशासाठी असलेल्या प्रेम गावातील प्रत्येक घटकांमध्ये लक्ष टाकून त्याला प्रकाश झोतात आणण्यासाठी हे ग्रामपंचायत कार्यकारणी काम करीत आहे यामध्ये प्रामुख्याने या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे व त्यांचे सहकारी अतिशय चांगल्या प्रकारचे काम ग्रामपंचायत मध्ये करीत आहेत निश्चितपणाने आपण सर्वांनी एकत्र येऊन या सर्व गावाचा विकास केला पाहिजे गावामध्ये सर्वांनी एकत्र येणे एकजुटीने राहणं काळाची गरज आहे जेव्हा आपण एकत्र येऊन आपला विकास करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने देशासाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली मानाचा सलाम असेल. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गुणसंपादन केलेले आहे त्यांच्या पाठीवरती ग्रामपंचायत ने शाबासकीची थाप दिली अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा पवार यांनी दिल्या. तसेच माजी सैनिक पवार व गावचे समाजसेवक विठ्ठल त्रिंबकराव राणे यांनी गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या दिनी माझा सन्मान केल्याबद्दल माजी सैनिक सुरेश पवार यांनी ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स