<em>ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर…!</em>
निबंध स्पर्धेत सिद्धेश उमेश डेळेकर प्रथम तर वक्तृत्व स्पर्धेत विराज अजित पाटील प्रथम.
वैभववाडी | प्रतिनिधी :
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रा.प सदस्य नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन विषयांपैकी एका विषयावरती पहिली ते चौथी व्हिडीओ वक्तृत्व स्पर्धा व पाचवी ते सातवी निबंध स्पर्धेचे ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. गावातील विद्यार्थ्यांना स्टेज डेरिंग यावे व गावातील विद्यार्थ्यांपैकी अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्याची प्रेरणा एखाद्याला मिळावी या स्वच्छ हेतूने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे यांनी मासिक सभेमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा ग्रामपंचायतकडून आयोजित व्हाव्या असा सभागृहात विषय मांडला त्यामध्ये सर्व सदस्यांनी नवल राज काळे यांच्या संकल्पनेला दाद देत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नियोजित वेळी ग्रामसेवक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाल्या. निकाल देखील जाहीर झाले व 75 व्या स्वतंत्र दिनाच्या वर्षी आयोजित केलेल्या अमृत महोत्सवाचा मूहूर्त धरून या सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ग्रामपंचायत मधील सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. विशेष म्हणजे वकृत्व स्पर्धेत विराज अजित पाटील हे प्रथम आले होते तेच पुढे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम तर जिल्हा वकृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे यश प्राप्त करू शकले. यामुळे नवलराज काळे यांनी जी संकल्पना मनात ठेवून स्पर्धा आयोजित केली ती स्पर्धा सार्थकी लागली. विराज ने यश प्राप्त केले त्यामागे शिराळे प्रशालेचे शिक्षक श्री विनोद करपे सर व त्यांच्या सहकारी शिक्षिका यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचसोबत विराज च्या कुटुंबाचे देखील सहकार्य मिळाले त्यामुळे गावाचे नाव रोशन झाले.
सदर आयोजित निबंध स्पर्धेत सिद्धेश उमेश डेळेकर इयत्ता सातवी प्रथम क्रमांक, अमर अरुण पाटील इयत्ता पाचवी द्वितीय क्रमांक, तर वकृत्व स्पर्धेत विराज अजित पाटील इयत्ता चौथी प्रथम क्रमांक, दिविका सत्यवान काळे इयत्ता दुसरी द्वितीय क्रमांक, गणेश विठ्ठल शेळके इयत्ता तिसरी तृतीय क्रमांक, स्वरूपा समीर पाटील तिसरी उत्तेजनार्थ अशा विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत यश संपादन केले. अशा सर्व विद्यार्थी स्पर्धकांना भारत देशाच्या 75 व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सडूरे शिराळे येथे आयोजित केलेल्या अमृत महोत्सवामध्ये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गावचे रहिवासी माजी सैनिक श्री पवार, प्रभारी सरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे ग्रामपंचायत सदस्या आकांक्षा जंगम, पुनम रामाने, लक्ष्मीबाई बोडेकर, ग्रामसेवक प्रशांत जाधव तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चव्हाण, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, माजी सैनिक संतोष राणे यांचे पिताश्री सुभाष राणे, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विजयसिंह काळे, दशरथ पडवळ, बचत गटाच्या सीआरपी दीक्षा रावराणे, शाळा समितीचे अध्यक्ष प्रभाकर राणे, गाव तलाठी अक्षय लोणकर, शाळेचे शिक्षक विनोद करपे सर, कूवर सर, खांबल मॅडम, कांबळे सर, भैराळे सर, व इतर शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)