ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरती कार्यरत असणाऱ्या आजी-माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्येक भारतीय नागरिकांनी सन्मान करणं गरजेचे..!</em>

<em>देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरती कार्यरत असणाऱ्या आजी-माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्येक भारतीय नागरिकांनी सन्मान करणं गरजेचे..!</em>

प्रकाशन: 17 Aug 2022 11:08 AM
वाचन संख्या 57

देशाच्या संरक्षणासाठी सडूरे गावाचे मोठे योगदान..

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात ग्रा.प. सदस्य नवलराज काळे यांचे प्रतिपादन…!

वैभववाडी | प्रतिनिधी : भारत देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत सडूरे शिराळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलत असताना ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री नवलराज काळे यांनी देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरती कार्यरत असणाऱ्या आजी-माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबाच्या भारतातील प्रत्येक नागरिकांनी सन्मान केला पाहिजे.

देशाच्या संरक्षणासाठी आपल्या गावाचे ही मोठ्या योगदान आहे. वयाच्या 21 व्या वर्षी संसारात गुंतण्याचे वय असताना, मित्रांसोबत, कुटुंब सोबत राहण्याचे दिवस असताना देखील सैन्य दलात भरती होऊन देशाचे संरक्षण करण्यासाठी सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घेणे गरजेचे आहे. वयाच्या 29 व्या वर्षी देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण गमावणे सोपी गोष्ट नाही. आपले कुटुंब आपल्यापासून दूर ठेवत देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरती कार्यरत राहणे खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे देशातील सर्व सैनिकांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावाच परंतु आपल्या वागणुकीतून आपण दैनंदिन जीवनात जगत असताना प्रत्येक क्षणाक्षणात या जवानांच्या प्रति चांगली भावना ठेवून त्यांच्या कुटुंबीयांचा आदर करून त्यांच्यासारखे कार्य करण्याचा प्रयत्न करून खऱ्या अर्थाने त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. असे केल्यावरच देशासाठी शहीद झालेल्या जवानांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. आज आपण सर्व देशाच्या 75 व्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आजचा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून आपण साजरा करीत आहोत. आपण आपल्या घरोघरी सर्वांनी आपल्या देशाचा तिरंगा हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत फडकवला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो 2017 पासून ते 2022 पर्यंत पाच वर्षाच्या कार्यकलामध्ये या गावातील सर्व वाडी वस्तींवरती दळणवळणाची सुविधा होण्याकरिता चालू केलेले चळवळ पूर्ण होत आहे नजीकच्या काळात पुढील काही दिवसात जे रस्तेकाम झालेले नाही परंतु ती कामे ग्रामपंचायत दप्तर मध्ये 23 नं नोंद करून घेतलेली आहेत ती लवकरच पूर्ण होतील. गावातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या जनतेला देखील पाणीपुरवठा होणार आहे पाच वर्षाच्या कार्यकाळात पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण अशा प्रमुख गोष्टींना केंद्र स्थानी ठेवत तुम्हा सर्वांची साथ घेत मी व माझे सहकारी तसेच ग्रामसेवक प्रशांत जाधव तुम्ही आम्ही सर्व यशस्वी वाटचाल करीत आहोत. त्यामुळे देशाचा अमृत महोत्सव आपण आनंदाने साजरा करू शकतो करतोय. आनंदाने हर घर झेंडा आपण फडकवू शकतो फडकवलाय याचा मला सार्थ अभिमान वाटतो. गावातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा, गुणवंत स्पर्धकांचा, गावातील ज्येष्ठ नागरिकांचा महिलांचा सन्मान करणे आमचं कर्तव्य आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास करूया सगळ्यांनी एक होऊया असे आवाहन करी समस्त गावकऱ्यांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देत नवलराज काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावचे रहिवासी माजी सैनिक श्री सुरेश पवार, प्रभारी सरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे ग्रामपंचायत सदस्या आकांक्षा जंगम, पुनम रामाने, लक्ष्मीबाई बोडेकर, ग्रामसेवक प्रशांत जाधव तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चव्हाण, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, माजी सैनिक संतोष राणे यांचे पिताश्री सुभाष राणे, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विजयसिंह काळे, दशरथ पडवळ, बचत गटाच्या सीआरपी दीक्षा रावराणे, शाळा समितीचे अध्यक्ष प्रभाकर राणे, गाव तलाठी अक्षय लोणकर, आरोग्य सेविका शितल चाफे शाळेचे शिक्षक विनोद करपे सर, कूवर सर, खांबल मॅडम, कांबळे सर, भैराळे सर, व इतर शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स