ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
<em>मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेत अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशनरीचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण…!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेत अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशनरीचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण…!</em>

प्रकाशन: 16 Aug 2022 10:55 PM
वाचन संख्या 115

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख निधीतून साहित्याचा पुरवठा…!

मालवण | सुयोग पंडित : मालवण नगरपालिकेच्या इमारतीतील व्यायामशाळेत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशनरिंचे लोकार्पण आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जिम मधील मशनरीवर व्यायामाचे प्रात्यक्षिक केले.आमदार वैभव नाईक यांनी शरीर सौष्ठव स्पर्धा घेतली त्यावेळी दर्जेदार जिम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.आमदार वैभव नाईक यांनी ती मागणी पूर्ण करुन आज प्रत्यक्षात जिम सुरू झाली आहे.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, जिम हि काळाची गरज झाली आहे. महेश कांदळगावकर यांच्यासह यतीन खोत, मंदार केणी व सहकारी नगरसेवक यांनी मालवणात चांगली जिम सुरु करण्याची मागणी माझ्याकडे केली होती. त्यानुसार शासन स्तरावर पाठपुरावा सुरु केला.शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २५ लाख निधी मंजूर करून अत्याधुनिक असे व्यायामशाळा साहित्य व मशीन्स उपलब्ध करण्यात आले आहेत.हे साहित्य व्यवस्थित हाताळून ते सुस्थितीत राखण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे.जिममध्ये अन्य सुविधा देखील उभारण्यात येत आहेत. तरुणवर्गाने जिमच्या माध्यमातून करिअर करण्यावर भर द्या. असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर,मंदार केणी, यतीन खोत,किरण वाळके,बाबी जोगी, भाई कासवकर, महेश जावकर,संमेश परब, मंदार ओरोसकर, प्रसाद आडवणकर, रुपेश सातार्डेकर,अन्वय प्रभू, अमेय देसाई, सेजल परब, दीपा शिंदे,सुनिता जाधव, शीला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, दुर्गेश गावकर, गीतेश चव्हाण, गणेश सातार्डेकर, सौ सामंत, सिद्धेश मांजरेकर, श्री. म्हाडगुत आदींसह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व मालवणचे तरुण उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स